Wednesday, March 19, 2025
Homeमहामुंबईराज्यात २० दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक

राज्यात २० दिवसांचाच रक्तसाठा शिल्लक

रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत दररोज ५५० युनिट, तर राज्यात १,५०० युनिट रक्ताची गरज भासते. सध्या राज्यात ६ मे पर्यंत केवळ ५८ हजार ८१८ युनिट रक्त साठा उपलब्ध आहे. हा रक्त साठा पुढील २० दिवस पुरेल इतका आहे. त्यामुळे लोकांनी पुढाकार घेत रक्तदान करावे तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांनी राज्यातील जनतेला केले.

रक्तदान सर्वांत श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. मुंबईसह राज्यभरात राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करत गरजूंना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. मात्र आता सुट्ट्या असल्याने लोक आपापल्या गावी जातात. त्यामुळे रक्तदान करण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे. त्यामुळे रक्तदान शिबीर आयोजित करत रक्तदान करावे, तसेच रक्तदान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. महेंद्र केंद्रे यांनी केले. दरम्यान राज्यात रक्तपेढींची संख्या ३५० आहे. तर मुंबईत ५७ रक्तपेढी आहेत.

रक्तदात्यांनो रक्तदानासाठी पुढे या!
मुंबईत दररोज साधारण ५५० युनिटपर्यंत रक्त रुग्णालयांमध्ये लागते. सध्या २० दिवस पुरेल इतका रक्तसाठा असला तरी हा रक्ताचा तुटवडा आहे. रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आवश्यकतेनुसार रक्त उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे छोट्या रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबीरे आयजित करावीत. तसेच रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. केंद्रे त्यांनी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -