मेलबर्न : ‘मिस युनिव्हर्स’ सीएना वीर या मॉडेलने वयाच्या २३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करताना तिचा अपघात झाला. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २ एप्रिल रोजी सिडनीच्या विंडसर पोलो ग्राऊंडमध्ये ती घोडेस्वारी करत होती. त्यावेळी घोड्यावरून पडून सिएनाचा अपघात झाला. त्यानंतर तिला तातडीने वेस्टमीड रुग्णालायत नेण्यात आले. तिथे तिला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले होते. गेल्या काही आठवड्यांपासून ती लाइफ सपोर्ट सिस्टीमवर होती. शनिवारी तिची प्राणज्योत मालवली. सिएनाला घोडेस्वारी करणे खूप आवडत होते. मिस युनिव्हर्स २०२२ या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती.
मिस युनिव्हर्स सिएनाचे निधन
ऑस्ट्रेलियामध्ये घोडेस्वारी करताना अपघात