Tuesday, July 23, 2024
Homeराशिभविष्यHoroscope : राशीभविष्य, दि. ०७ मे ते १३ मे २०२३

Horoscope : राशीभविष्य, दि. ०७ मे ते १३ मे २०२३

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ७ मे ते १३ मे २०२३

प्रगतीकडे वाटचाल
मेष – आपल्या राशीत अनुकूल ग्रह असल्याने हा कालावधी आपल्याला शुभ जाणार आहे. स्वतःचे व्यवसाय असणाऱ्यांना फायदेशीर ठरेल. आपली प्रगतीकडे उत्तम वाटचाल असणार आहे. महत्त्वाची सरकारी कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रयत्नशील असणे आवश्यक राहील. रखडलेले जमीन जुमल्या संबंधित असलेले कार्य पूर्ण होईल. त्यातून भरघोस आर्थिक फायदा मिळू शकतो. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होतील. मात्र सुरुवातीला सर्व व्यवहार काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे ठरेल. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. तरुणांना संधी येतील. उत्तम प्रवास योग आहेत.
प्रतिष्ठित लाभ होतील 
वृषभ – समाजातील मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होऊन भेटीगाठी होतील. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली महत्त्वाची कार्ये पूर्ण होण्यासाठी या भेटीगाठी उपयोगी पडतील. मध्यस्थी यशस्वी होतील. जमीन व स्थायी संपत्ती संबंधित असलेली रखडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. सर्वमान्य तोडगा निघेल. भावंडांशी सख्य राहील. लहान-मोठे गैरसमज दूर होतील. जवळचे तसेस दूरचे प्रवास करावे लागतील. चांगल्या धनलाभाची शक्यता. नवीन संधी उपलब्ध होतील. चिंता मिटतील. व्यावसायिकांना प्रतिष्ठित फायदे होतील.
व्यावसायिक अनुकूलता
मिथुन – अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे अनेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गांशिवाय उत्पन्न वाढू शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चाला कात्री द्या. अनेक चांगल्या घटना घडतील. खरेदी-विक्रीतून चांगले लाभ. काही महत्त्वाचे सौदे होतील. सरकार दरबारची कामे पूर्ण होताना दिसतील. ओळखीतून चांगले लाभ आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नवीन मार्ग शोधू शकाल. मात्र, नियोजन आवश्यक ठरेल. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील जातकांना मानसन्मानाचे योग. एक नवीन ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण होईल.
शुभग्रहांचे पाठबळ
कर्क – या कालावधीमध्ये आपल्याला शुभग्रहांचे चांगले पाठबळ राहणार आहे. उत्तमोत्तम प्रवास घडू शकतात, मात्र प्रवासात स्वतःची काळजी घेणे अपरिहार्य ठरेल तसेच भाजणी, कापणे इत्यादींपासून सावध राहणे गरजेचे ठरेल. वाहने सावकाश चालवा, कोणतीही स्पर्धा नको. नोकरीमध्ये हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. गटबाजी आणि राजकारणापासून दूर राहणे गरजेचे ठरेल तसेच स्वतःच्या कार्याकडे लक्ष देणे हितकारक ठरेल. आपल्या ज्ञानाविषयी अद्यावत राहणे गरजेचे ठरेल. वरिष्ठांबरोबर वादविवाद टाळणे हितकारक ठरेल. आपल्या कर्तृत्वात वृद्धी होताना दिसेल. स्त्रियांना कार्यक्षेत्रात कामाचा ताण जाणवणार आहे.

व्यावसायिक प्रगती
सिंह – अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे अनेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गांशिवाय उत्पन्न वाढू शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चाला कात्री द्या. अनेक चांगल्या घटना घडतील. खरेदी-विक्रीतून चांगले लाभ. काही महत्त्वाचे सौदे होतील. सरकार दरबारची कामे पूर्ण होताना दिसतील. ओळखीतून चांगले लाभ आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण नवीन मार्ग शोधू शकाल. मात्र, नियोजन आवश्यक ठरेल. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील जातकांना मानसन्मानाचे योग. एक नवीन ऊर्जा व आत्मविश्वास निर्माण होईल.

मतभेद मिटतील
कन्या – आतापर्यंत आलेला मनावरचा ताण कमी होण्यास सुरुवात होईल. जोडीदाराची साथ लाभेल. धनलाभाचे योग आहेत. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची मदत मिळेल. आपल्या जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र आपल्या बोलण्यावर व वर्तनावर नियंत्रण आवश्यक. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे गतिमान होतील, मतभेद मिटतील. नोकरीत अनुकूल स्थिती निर्माण होईल मात्र आपण राजकारण व गटबाजीपासून दूर राहा. मित्रमंडळींच्या वर्तुळात वादविवाद टाळा. प्रवास घडतील. प्रवासात आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे.
कामे गतीमान होतील
तूळ – प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामे गतीमान होतील. सरकारी कामात लागणारा विलंब नाहीसा होईल. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल. एखादे महत्त्वाचे काम होऊ शकते. व्यवसायिकांनी सरकारी कायदे व नियम कसोशीने पाळायला हवेत. आर्थिकदृष्ट्या बरोबर होईल काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर ती नियंत्रण आवश्यक. अतिआत्मविश्वास नको. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. जीवनसाथी बरोबर असलेले मतभेद संपुष्टात येतील.

समाधान लाभेल
वृश्चिक – अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकाल. यशाचे प्रमाण वाढते राहील. नोकरीत आपल्याला नवीन अधिकार मिळेल. पदोन्नती आणि वेतन वृद्धीचे योग आहेत. सामाजिक मानसन्मानात वाढ होऊन प्रतिष्ठेत भर पडेल. एखाद्या समारंभात मानाचे पद मिळेल. आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहील. प्रेमामध्ये अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा घडून देवदर्शन होईल. त्यामुळे समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या राहतील. त्यासाठी खर्चही करावा लागेल. आरोग्याकडे लक्ष ठेवा. विवाह ठरतील.
भाग्याची साथ लाभेल
धनु – या सप्ताहात आपल्याला भाग्याची साथ मिळू शकते. प्रदीर्घ काळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. अडलेली कामे होतील पर्यटन किंवा कामानिमित्त दूरचे तसेच जवळचे प्रवास घडू शकतात. प्रवास कार्य सिद्ध होतील. नोकरीत मानसन्मान मिळू शकतो. पदोन्नती तसेच वेतन वृद्धी होईल. मात्र नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. त्याचप्रमाणे बदलीची तयारी ठेवा. आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल. रागावर नियंत्रण आवश्यक. कुटुंबातील मुलांविषयी सकारात्मक राहा. व्यवसायात नवीन बदल फायद्याचे ठरतील. जुनी येणी वसूल होतील. मात्र, भागीदारी व्यवसायात भागीदाराशी मतभेद होऊ शकतात ते टाळा.
नियोजन उपयोगी पडेल
मकर – आपल्यासमोरील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे होतील. विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे. मात्र आजचे काम आजच करा, कामामध्ये विलंब नको. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळेल. वरिष्ठांबरोबर असलेले संबंध सुधारतील तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जमीन जुमला व संपत्तीविषयीचे व्यवहार गतीमान होतील. मध्यस्ती फलद्रूप होतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले मतभेद संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. आपल्या मतास प्राधान्य मिळेल. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. मात्र, अभ्यासामध्ये दुर्लक्ष करू नका. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल.
लहान-मोठ्या प्रवासाचे योग
कुंभ – कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला अपेक्षित सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. व्यावसायिक बदल फायदेशीर ठरतील. नवीन तंत्रज्ञान व नव्या संकल्पनांचा वापर करू शकाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता, मात्र आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. प्रवासाचे योग. सहकुटुंब सहपरिवार मित्रमंडळींसमवेत लहान-मोठ्या प्रवासाचे योग आहेत. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. राजकारणी जातकांना विरोध झेलावा लागेल. विरोधक आक्रमक बनू शकतात.
क्रोधावर नियंत्रण आवश्यक
मीन – संमिश्र ग्रहमान यामुळे आपल्याला संमिश्र फळे मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कामांमध्ये अडथळे जाणवू शकतात. त्याचप्रमाणे धावपळ आणि दगदग होईल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य करावे, मात्र स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक. व्यवसायिक परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यावसायिक उलाढाल वाढून फायद्याच्या प्रमाणात वाढ होईल. जमीन-जुमला यांची कामे गतिमान होऊ शकतात. सरकारी नोकरीत प्रलोभने टाळणे हिताचे ठरेल. वाहन चालविताना दक्ष राहा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -