Tuesday, July 1, 2025

द केरला स्टोरी सर्वांनी पाहावा, भाजप आमदार नितेश राणे यांचे आवाहन

द केरला स्टोरी सर्वांनी पाहावा, भाजप आमदार नितेश राणे यांचे आवाहन

मुंबई: द केरला स्टोरी हा चित्रपट किती महत्वाचा आहे हे भाजप आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांसमोर मांडले आहे. द केरला स्टोरी हा सिनेमा नसून सत्यघटना आहे. आपल्या घरात आपल्या मुलगी, बहीणीसोबत असा प्रकार घडू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी लव्ह जिहाद समजून घेणं महत्वाचं आहे. यासाठी द केरला स्टोरी हा चित्रपट नक्की पाहा असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.


लव्ह जिहाद या विषयावरील द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला असून त्यात हिंदू मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांचे कशाप्रकारे धर्मांतर करुन मानसिक आणि शारीरिक छळ केला जातो, हे दाखवले आहे. नितेश राणे यांनी हा चित्रपट सर्वांनी तर जरुर पाहावा पण इतरांनाही दाखवावा आणि हिंदू भगीनींना लव्ह जिहाद पासून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment