श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मूतील राजौरीतील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरता भारतीय लष्कराने मोहीम हाती घेतली असून जम्मूमध्ये रोज चकमकी घडत आहेत. शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे ५ जवान शहीद झाले होते, तर शनिवारी सकाळी जम्मू पोलिसांनी पुन्हा ऑपरेशन सुरू केले. राजौरी आणि बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास यश मिळाले आहे. २१ एप्रिल रोजी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला करून दहशतवाद्यांनी धूम ठोकली होती. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. याप्रकरणातील दहशतवाद्यांना शोधण्याकरता जम्मू पोलीस आणि भारतीय लष्कर संयुक्तिकरीत्या कारवाई करत आहे. राजौरी येथे हे दहशवादी एका गुहेत लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून दहशतवाद्यांविरोधात चकमक सुरू केली; परंतु गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल दहशतवाद्यांनीही हल्ला केला. काल, पुन्हा दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला केला. यामुळे कालही पाच जवान शहीद झाले, तर स्पेशल फोर्समधील एक अधिकारी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जम्मूमध्ये पुन्हा चकमक, दोन दहशतवादी ठार
जम्मूतील राजौरीतील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरता भारतीय लष्कराची मोहीम
