Wednesday, July 2, 2025

आज 'राज'गर्जना कोणाच्या विरोधात रिफायनरी विरोधक की सरकारच्या?

आज 'राज'गर्जना कोणाच्या विरोधात रिफायनरी विरोधक की सरकारच्या?

रत्नागिरी: मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज रत्नागिरीतील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. सध्या रत्नागिरीत बारसू रिफायनरीवरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. विरोधी पक्षांकडून या रिफायनरी प्रकल्पाला मोठा विरोध केला जात असताना. आज राज ठाकरे याबाबत काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. सध्या या सभेची जोरदार तयारी सुरु असून मनसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.


डिसेंबर महिन्यात कोकण दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी कोकणात जाहीर सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. या सभेसाठी रत्नागिरी किंवा मालवण यापैकी ठिकाणाची चाचपणी सुरू होती. अखेर रत्नागिरीत सभा घेण्याचे जाहीर करण्यात आले. पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांची प्रथमच रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आल्याने उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर पक्षाचे झेंडे लावण्यात आले असून, ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या आहेत.




Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >