Tuesday, July 1, 2025

असा ही एक मनस्वी चाहता!

असा ही एक मनस्वी चाहता!

झी मराठीचा उत्सव नात्यांचा हा कार्यक्रम खूप जल्लोषात कोल्हापूरमध्ये पार पडला. या उत्सवात ‘तू चाल पुढं’ व ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकांमधील प्रमुख कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या उत्सवात अनेक चाहत्यांच्या आगमनाने प्रेक्षागार फुलून गेले होते. अशा या अनेक असंख्य चाहत्यांपैकी एक म्हणजे ‘ओमकार मकरंद देशमुख’ यांनी मालिकेतील प्रमुख कलाकारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि तेवढ्याच उत्साहाने, आनंदाने कलाकारांनी देखील या चाहत्याची इच्छा पूर्ण करून त्याच्याशी संवाद साधला व फोटो पण काढले. एक विशेष गोष्ट म्हणजे ओमकार मकरंद देशमुख हे असे व्यक्तिमत्त्व आहे, त्यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घ्यावी. कुठलीही निराशा न बाळगता जीवन कसे आनंदाने जगावे, हे त्यांचाकडून आत्मसात करावे. अशा या चाहत्यामुळे कलाकारांनाही उत्स्फूर्तपणे काम करण्याची प्रेरणा मिळून जाते.

Comments
Add Comment