Friday, July 11, 2025

आयपीएलमधील कर्णधाराच्या पत्नीसोबत धक्कादायक प्रकार, पोलिसांकडूनही उडवाउडवीचे उत्तर

आयपीएलमधील कर्णधाराच्या पत्नीसोबत धक्कादायक प्रकार, पोलिसांकडूनही उडवाउडवीचे उत्तर

नवी दिल्ली: आयपीएलमधील कोलकाता नाईट राईडर्सच्या कर्णधाराच्या पत्नीचा दिल्लीमध्ये दोन तरुणांनी पाठलाग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत त्यातील एका तरुणाला अटक केली आहे. मात्र, ही कारवाई करण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी तिला दिलेले उत्तर धक्कादायक आहे.


कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नीतीश राणा हिच्या पत्नीच्या कारचा दिल्लीत दोन तरुणांनी पाठलाग केला. घटनेनंतर ती तात्काळ पोलिस स्थानकात पोहोचली पण दिल्ली पोलिसांनी दिलेले उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. पोलिस सल्ला देत म्हणाले की, ' आता तू सुरक्षित पोहचली आहेस ना. त्यामुळे आता जे झालं ते विसरून जा. जर या पुढे अशी घटना घडली तर गाडीचा नंबर नोट करून ठेव.'


याबाबत साचीने सोशल मिडियावर पोस्ट टाकताच पोलिसांनी याची दखल घेत त्यातील एका तरुणाला अटक केली. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतीश राणाची पत्नी साची मारवाह काम आटोपून घरी निघाली होती. त्यावेळी दिल्लीतील क्रांती नगर येथे दोन तरुणांनी बाईकवरुन पाठलाग केला. पाठलाग करण्याबरोबरच कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. साची मारवाह यांनी हिमतीने या घटनेचा सामना केला.




Comments
Add Comment