Tuesday, July 16, 2024
Homeमहामुंबईमध्य रेल्वेवर आज रात्रकालीन पॉवरब्लॉक

मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन पॉवरब्लॉक

लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे मार्गावरील कोपर स्थानकात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी शनिवारी मध्यरात्री १ ते रविवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत सीएसएमटी ते कल्याण/कसारा विभागात पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल केला असून सीएसएमटीवरून अंबरनाथला जाणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.५१ वाजताची असेल.

त्यानंतर कर्जत दिशेने कोणतीही लोकल चालविण्यात येणार नाही. तसेच कसाऱ्याकडे जाणारी शेवटची टिटवाळा लोकल सीएसएमटीवरून रात्री १०.५० वाजता सुटणार आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाच्या दुसऱ्या ओपन वेब गर्डरच्या उभारणीसाठी शनिवारी मध्यरात्री कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या व जलद मार्गावर तसेच सहाव्या आणि पाचव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. याचदरम्यान दिवा – ठाणे विभागातील दिवा रोड उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्यासाठी मध्यरात्री १.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच आंबिवली-खडवली दरम्यान टिटवाळा येथे उड्डाणपुलासाठी गर्डर उभारणीचे काम मध्यरात्री १ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ब्लॉकमध्ये केले जाणार आहे.

सीएसएमटीवरून अंबरनाथला जाणारी शेवटची लोकल शनिवारी रात्री ११.५१ वाजता असेल. त्यानंतर कर्जत दिशेकडे जाणारी लोकल नसेल. तसेच, कसाऱ्याकडे जाणारी शेवटची टिटवाळा लोकल सीएसएमटीवरून रात्री १०.५० वाजता सुटेल. ब्लॉकनंतर रविवारी पहाटे ४.१० वाजता कर्जतहून तर, टिटवाळ्याहून पहाटे ५.११ वाजता पहिली लोकल सीएसएमटीसाठी सुटेल.

शनिवारी रात्री ९.३५ वाजताची अंबरनाथ येथून सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल, शनिवारी सीएसएमटी येथून मध्यरात्री १२.०४, पहाटे ५.१६ आणि सकाळी ६.१९ वाजता अंबरनाथसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द असतील. शनिवारी मध्यरात्री १२.२४ वाजता कर्जत येथून सीएसएमटी सुटणारी लोकल, अंबरनाथ येथून मध्यरात्री ३.४४ ची, मध्यरात्री ४.०८ वाजताची सीएसएमटी लोकल रद्द असतील. कर्जत येथून मध्यरात्री २.३३ आणि ३.४० ची सीएसएमटी लोकल रद्द असेल.

लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका
शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हावडा- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, आदिलाबाद- सीएसएमटी एक्स्प्रेस, शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अमरावती- सीएसएमटी एक्स्प्रेस, गोंदिया- सीएसएमटी एक्स्प्रेस, सिकंदराबाद – सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस, मंगला- लक्षद्वीप एक्स्प्रेस, दुरांतो एक्स्प्रेस आणि पंजाब मेल नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहचतील.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मार्ग बदलणार
भुवनेश्वर-सीएसएमटी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस, गदग-सीएसएमटी एक्स्प्रेस, चेन्नई-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि तिरुनेलवेली- दादर एक्स्प्रेसला कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येतील. सीएसएमटी – वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पुढील डाऊन गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -