Monday, October 27, 2025
Happy Diwali

मास्टर ब्लास्टर बनलाय शेफ...

मास्टर ब्लास्टर बनलाय शेफ...

मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेटचा देव, भारतरत्न सचिन तेंडुलकरने नुकतीच वयाची ५० वर्षे पूर्ण केली. संपूर्ण क्रिकेट जगतासोबतच इतर लोकांनीही सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सचिनने कुटुंबासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकरही दिसत आहे.

सचिनने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आपला ५०वा वाढदिवस मी कुटुंबासोबत वेगळ्या प्रकारे साजरा करत आहे. सध्या आयपीएलमध्ये खेळत असलेल्या अर्जुनलाही आपण मिस करत असल्याचे त्याने सांगितले. सचिनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो विदर्भात निसर्गाचा आनंद लुटताना दिसत असून गावात पारंपरिक पद्धतीने जेवण बनविण्याचा आनंद लुटत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा