उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
रत्नागिरी: कोकणातील बारसू रिफायनरी विरोधात आज उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असतानाच शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. रिफायनरी होणार की नाही हा निर्णय स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुनच घेतला जाईल. काल महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन त्यांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंकडून बारसू रिफायनरीच्या विरोधात पैसे घेऊन लोकांना भडकविले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्याकडून वेळोवेळी केला जात आहे. सकाळी भाजपचे माजी खासदार निलेश राणे आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समर्थन मोर्चा काढण्यात आला. उद्धव ठाकरे यांचे पितळ केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तसेच नितेश राणे आणि निलेश राणे यांनी वेळोवेळी उघडे पाडले आहे.