Tuesday, March 18, 2025
Homeताज्या घडामोडीकिंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात मुंबईच्या डबेवाल्यांची उपस्थिती

किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात मुंबईच्या डबेवाल्यांची उपस्थिती

डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि शाल दिली भेट

मुंबई : इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आज ६ मे रोजी इंग्लंडचे नवे राजा म्हणून प्रिन्स किंग चार्ल्स तिसरे शपथ घेणार आहेत. आज त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चक्क मुंबईच्या डबेवाल्यांनादेखील निमंत्रण मिळाले आहे.

मुंबईचे डबेवाले आणि किंग चार्ल्स यांचं जुने मैत्री संबंध आहेत. गेल्या वर्षी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्व डबेवाल्यांनी मुंबईत प्रार्थना सभा घेतली होती. ही मैत्री लक्षात घेता भारतातील ब्रिटनचे उच्चायुक्त यांनी हॉटेल ताज येथे राज्याभिषेकानिमित्त आयोजित केलेल्या समारंभाचे निमंत्रण त्यांना दिले होते.

या निमंत्रणाचा मान राखत या समारंभाला किंग चार्ल्स यांचे जवळचे मित्र मानले जाणाऱ्या मुंबईतल्या डबेवाल्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईतील ताजमहल हॉटेलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी पुणेरी पगडी आणि शाल भेट म्हणून पाठवली आहे. तसेच डबेवाल्यांची ओळख असलेली गांधी टोपी देखील त्यांना भेट देण्यात आली आहे. ही माहिती मुंबई डबेवाला संघटनेच्या वतीने सुनील शिंदे यांनी दिली.

या कार्यक्रमाला मुंबईतील अनेक उद्योजक, महाराष्ट्र सर्कल सरकारमधील अधिकारी, कॉमनवेल्थ देशाचे कौन्सिल जनरल उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -