Thursday, July 10, 2025

काँग्रेस दहशतवादाच्या पाठीशी!

काँग्रेस दहशतवादाच्या पाठीशी!

'द केरला स्टोरी'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर निशाणा


बंगळुरू : 'द केरला स्टोरी' सिनेमा आज प्रदर्शित झाला असून या चित्रपटाची सध्या संपूर्ण देशभरात मोठी चर्चा सुरु आहे. 'द केरला स्टोरी' बद्दल काही हिंदुविरोधी लोकांनी मुद्दामहून वाद सुरु केले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील रॅलीत भाषण करताना ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना थेट काँग्रेसवर निशाणा साधला.


कर्नाटकच्या बल्लारी येथील रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट दहशतवादाचे कुरूप सत्य दाखवते आणि दहशतवाद्यांच्या योजनांचा पर्दाफाश करते. हा चित्रपट दहशतवादी कटावर आधारित आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.





आपल्या भाषणात काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चित्रपटाला विरोध करून काँग्रेस दहशतवादाच्या पाठीशी उभी आहे हे यामधून दिसत आहे.


दरम्यान, धर्मनिरपेक्ष केरळ समाज हा चित्रपट कशासाठी स्वीकारेल, असे प्रतिपादन करत उच्च न्यायालयाने आज याचिकाकर्त्यांना विचारले की, हा चित्रपट काल्पनिक आहे, इतिहास नाही, त्यामुळे समाजात सांप्रदायिकता आणि संघर्ष कसा निर्माण होईल, असा सवाल याचिकाकर्त्यांना केला.

Comments
Add Comment