Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणगुहागर एसटी डेपोचा गलथान कारभार

गुहागर एसटी डेपोचा गलथान कारभार

पुणे मार्गावरील एसटी बसेसमध्ये कायमस्वरूपी बिघाड

चिपळूण (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गुहागर एसटी डेपोचा कारभार अत्यंत गलथान असून अनेक एसटी बसेस नादुरुस्त, तरीही रस्त्यावर लांब पल्ल्याच्या फेऱ्या सोडतात. एसटी बस रस्त्यातच कायमस्वरूपी बिघाड होऊन नादुरुस्त होतात. प्रवाशांचा खोळंबा करण्यात गुहागर आगाराचा प्रथम क्रमांक लागतो. गुहागर डेपोत एकूण ६५ एसटी गाड्या आहेत. ७४ शेड्युल आहेत. उन्हाळी हंगामात लांब पल्ल्याच्या गाड्या बंद केल्या जातात.

गुहागर-कोल्हापूर दुपारी ३ वा. सुटणारी बस गेले आठवडाभर बंद आहे. १५ ते १६ गाड्या नादुरुस्त आहेत. ३ मे रोजी डेपो मॅनेजर म्हणून वनकुंद्रे यांनी प्रभारी मॅनेजर म्हणून चार्ज घेतला. ३ मे पहिल्या दिवशीच पुणे महामार्गावरील स्वारगेट-गुहागर गाडी सातारा येथे पंक्चर झाली.

गाडीचा पंक्चर सातारा डेपोत लवकर काढला जात नव्हता. प्रवाशांना तिष्ठत बसावे लागले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार व कोकण ग्रामीण विभागाचे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी सातारा डेपोचे मॅनेजर यांना भेटले. त्यांनी रत्नागिरी जिल्हा विभाग नियंत्रक अधिकारी गुहागरचे वरिष्ठ अधिकारी स्वामित शिंदे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. स्वारगेट गुहागर गाडीचे पुढचे चाक पंक्चर होते ते खोलले असता चार-पाच अनावश्यक उपयोगी नसलेल्या ट्यूब होत्या. त्यामुळे केव्हाही अपघात होऊन प्रवासांच्या जीवावर बेतले असते. तिथे कोकण प्रवासी महासंघाचे ग्रामीण विभाग महासंघाच्या अध्यक्षांनी चाक व्यवस्थित दुरुस्त करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

पिंपळी- चिंचवड-गुहागर ही बस कोंडे येथे बंद पडली. गाडी नंबर २१४९ गाडी, नंबर २२७० या गाड्या नादुरुस्त असून बैलगाडी पुढे जाईल. पण या गाड्या जात नाहीत. उन्हाळी हंगामात गुहागर डेपोने प्रवासांना तिष्ठत ठेवू नये. गाड्या व्यवस्थित लांब पल्ल्यासाठी सोडाव्यात. पुणे मार्गावर कायम ब्रेक डाऊन गाड्या सोडल्या जातात. कोकण प्रवासी ग्रामीण विभाग महासंघाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी चांगली सुविधा देण्याची मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -