Wednesday, April 23, 2025
Homeब्रेकिंग न्यूजबेळगावासाठी शिवसेना लढत होती तेव्हा संजय राऊत कुठे होते?

बेळगावासाठी शिवसेना लढत होती तेव्हा संजय राऊत कुठे होते?

भाजप आमदार नितेश राणेंचा परखड सवाल

लोकप्रभाचे संजय राऊतने लिहिलेले हिंदुत्वाविरोधी लेख दाखवु का?

मुंबई: बेळगावसाठी भाजपने काय केले असा वाह्यात प्रश्न विचारणाऱ्या संजय राऊत यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ज्यावेळी बेळगावसाठी शिवसेना संघर्ष करत होती. अनेक नेते तुरुंगात गेले त्यावेळी संजय राऊत कुठे होते असा परखड सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, संजय राऊत आणि हिंदूत्व यांचा काहीही संबंध नाही. संजय राऊतांचे मी लोकप्रभाचे लेख काढून दाखवतो त्यात संजय राऊत किती हिंदुत्ववादी होते हे कळेल. त्यावेळी हिंदूत्ववादावर जहरी टीका करणारे लेख संजय राऊत यांनी लिहिले आहेत. काल बेळगावातदेखील ते का प्रचाराला गेले हे मला माहित आहे. त्यांची आमच्या बेळगावमधील कार्यकर्त्यासोबत झालेल्या संभाषणात संजय राऊत यांनी पैसे मागितल्याचा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तो उमेदवार पैसे देण्यास तयार नव्हता त्यामुळे त्याच्या विरोधात संजय राऊत प्रचाराला गेले. हीच संजय राऊत यांच्याशी मराठी माणसाची एकनिष्ठा आहे. अशा शब्दांत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर खरमरीत टीका केली.

भांडण लावायची काम करतात

संजय राऊत हे भांडण लावायची काम करतात अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. ते म्हणाले आज सामनाच्या अग्रलेखात तुम्ही नीट पाहु शकता की पवार कुटुंबियांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून कसा केला जातोय. काल नाना पटोले संजय राऊतांना चोमडे म्हणाले त्याच भाषेत मी बोलतो. हा कारटा घरात फक्त भांडण लावून देतो. हा घरभेदी असून पवार कुटुंबाने त्यांना घरात घेऊ नये. आधी त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भांडणं लावून दिली. आता त्यांचा पवारांच्या घरावर तसंच तेजस आणि आदित्य ठाकरे यांच्यावर डोळा आहे. राणे साहेबांनी शिवसेना सोडण्याचं कारणं उद्धव ठाकरेचं होतं. अशा शब्दांत संजय राऊतांचे नितेश राणे यांनी वाभाडे काढले.

संपादकांकडे इतका पैसा येतो कुठून?

महाराष्ट्र आणि देशातील एक संपादक असा दाखवा ज्याच्याकडे संजय राऊतकडे आहे तितकी संपत्ती असेल. याच्याकडे एवढ्या महागड्या गाड्या येतात कुठून? त्याचा इनकम सोर्स काय? जे प्रेम तो बेळगावातील मराठी माणसांबद्दल दाखवतोय ते पत्राचाळीतील मराठी माणसांबद्दल कुठे गेले? त्यांच्या आयुष्याची जी जमापूंजी असेल त्या किमतीत हा आणि याचा शेठ आदित्य हॉटेलमध्ये जेवतात. यांच्याकडे हा इतका पैसा येतो कुठुन

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी १०० कोटी घेतले

बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होऊ नये म्हणून १०० कोटी घेतल्याचा आरोप नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. तसेच बारसूच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -