मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थानार्थ ६ मे रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. यावेळी भाजपतर्फे समर्थन मोर्चा काढला जाणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, कोकणातील बारसू येथे होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे येऊन त्यातून रोजगार निर्मिती होईल. पायाभूत सुविधा, शैक्षणिक व आरोग्याच्या उत्तम व्यवस्था निर्माण होतील त्यामुळे हा प्रकल्प होणे आवश्यक आहे.
काही लोक म्हणत आहेत कोकणाचा कॅलिफोर्निया करू. कॅलिफोर्नियात असे १४ प्रकल्प आहेत. विरोधकांच्या अज्ञानामुळे हा प्रकल्प थांबू नये म्हणून बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मी ६ मे २०२३ रोजी कोकणात जाणार आहे.
त्यामुळे या समर्थन मोर्च्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोकणातील बारसू येथे होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाच्या विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे येऊन त्यातून रोजगार निर्मिती होईल. पायाभूत सुविधा,शैक्षणिक व आरोग्याच्या उत्तम व्यवस्था निर्माण होतील त्यामुळे हा प्रकल्प होणे आवश्यक आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 4, 2023