Wednesday, July 9, 2025

आज केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे मंगळवेढ्यात

आज केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे मंगळवेढ्यात

मंगळवेढा: मंगळवेढा तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग निर्मितीला चालना मिळावी या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ, इंग्लिश स्कूल येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आज दुपारी ३ वाजता कृषी उद्योजकता मेळावा संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती अध्यक्ष अँड. सुजित कदम व संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी कदम महाडिक यांनी दिली.


आज दुपारी ३ वाजता केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजक मेळावा व महोत्सवाचा समारोप होणार आहे. अध्यक्षस्थानी आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे असणार आहेत.


यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार शहाजी पाटील, आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्र. कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, प्रा. शिवाजीराव सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.


केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील उत्पादित होणाऱ्या अन्नधान्याच्या संबंधित प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत मात्र या उद्योगाची माहिती ग्रामीण भागात नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित राहिले आहेत.


त्यांना या उद्योगाची माहिती व्हावी व आपल्या भागात नवीन उद्योग निर्माण व्हावेत यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा