Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीसंजय राऊत काँग्रेसची दलाली करायला इथे येतात

संजय राऊत काँग्रेसची दलाली करायला इथे येतात

देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

बेळगाव: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत बेळगावात येऊन काँग्रेसची दलाली करत असल्याची घणाघाती टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली, तर मी इथे येणार नाही. ते काँग्रेसची दलाली करण्यासाठी इथे येतात. आम्हाला सांगण्यापेक्षा संजय राऊतांचा मित्रपक्ष काँग्रेस आहे. त्यांनी काँग्रेसला सांगायला पाहिजे होतं की तुम्ही इथे उमेदवार उभे करू नका, त्यांच्या नेत्यांना प्रचाराला आणू नका. कारण काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मतं कमी करण्यासाठी, काँग्रेसची दलाली करण्यासाठी संजय राऊत इथे आले आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बेळगावसह सीमाभागावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करण्याचं आव्हान दिलं आहे. त्याला उत्तर देताना आज बेळगावमध्ये प्रचारासाठी दाखल झालेल्या देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर खोचक शब्दांत टीका केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -