Tuesday, November 5, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसमर्थ सिद्धिविनायक महिमा

समर्थ सिद्धिविनायक महिमा

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त होऊन कीर्ती सर्वत्र पसरली.

क्कलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते. एखादे लेकरू जसे आपल्या आईला सर्व काही सांगते, तिच्यावर प्रेम करते, तिच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवते. अगदी तसेच नाते स्वामी समर्थ आणि जांभेकर महाराजांचे होते. एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक, रामकृष्णा, तुला काय हवे? अशी विचारणा स्वामींनी केली. ते स्वामींना म्हणाले की, स्वामी मला काही नको. तुम्हाला काही द्यायचे असेल, तर ते माझ्या सिद्धिविनायकाला वैभव द्या. रामकृष्णबुवांची इच्छा ऐकून स्वामींना खूप आनंद झाला. आपल्या लाडक्या भक्ताने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले, ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभवसंपन्न ईश्वरच आपल्या भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील.

एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या. ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली. स्वामींनी रामकृष्णबुवांना आशीर्वाद दिला आणि म्हणाले की, तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझे भाग्य आहे. मुंबईला गेल्यावर मंगळवारी सिद्धिविनायकाला जा. तिथे तू मंदार वृक्षाचे रोपटे लाव. तुझा हा मंदार इंचाइंचाने वाढेल, तसतसा तुझा सिद्धिविनायक वाढेल, ज्या दिवशी तो मंदार बहरेल, त्या दिवशी सिद्धिविनायक वैभवाने भरलेला असेल. स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशीर्वाद दिला. चौथ्या दिवशी रामकृष्णबुवा प्रभादेवीला आले. प्रथम त्यांनी मंगळवारी मंदाराचे रोपटे सिद्धिविनायक देवळात लावून म्हणाले, स्वामी मी माझे काम केले. आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा, ते हात जोडून म्हणाले की, हे गजानना, स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होवो, असे आशीर्वचन रामकृष्णबुवांनी सिद्धिविनायकाकडे मागितले. स्वामींचा आशीर्वाद खरा ठरला. जांभेकर महाराजांनी सिद्धिविनायकासाठी मागितलेला मंदार वृक्ष जसा जसा बहरत गेला तसे सिद्धिविनायकाला वैभव प्राप्त झाले आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताची इच्छा पूर्ण केली. स्वामी आशीर्वादाने मंदिर प्रसादिक झाले व कोरोडो भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्या.

समर्थ सिद्धिविनायक महिमा
स्वामी मनाने उदार
बैसले खोलूनी हृदयाचे दार ।। १।।
मागे वृक्ष हिरवा मंदार
छाया देत होता थंडगार ।। २।।
बाजूस बैसले भक्त जांभेकर
स्वामी विनविती जोडूनी कर ।।३।।
स्वामी वदती मागतू वर
प्रसन्न मी भक्तावर ।।४।।
भक्त वदे स्थापिला नूतन गणेश
मुंबापुरी प्रभादेवीस तो सर्वेश ।।५।।
द्यावा त्यास आशीर्वाद पूर्ण
इच्छा होईल विनायकाची पूर्ण ।।६।।
होईल जो सिद्धिविनायक पूर्ण
साऱ्यांची इच्छा करील पूर्ण ।।७।।
स्वामी वदे तथास्तु तथास्तू
भव्यदिव्य होईल मोठी वास्तू ।।८।।
ऐश्वर्यवान श्रीमंती वास्तू
जगभर गवगवा वास्तूपुस्तू ।।९।।
सोन्याचा गणपती विश्वपती
ज्याने केली विश्वाची उत्पत्ती ।।१०।।
घेऊन जा छोटे झाड मंदार
लाव शोधूनी मुहूर्त मंगळवार ।।११।।
वाढेल जशी एक एक इंच
वाढवेल कीर्ती उंचउंच ।।१२।।
जसा वाढेल वृक्ष मंदार
होईल सोन्याचेच द्वार ।।१३।।
सोन्या रुप्याचा भिंतीद्वार
भक्त देतील रूपे, चांदी फार ।।१४।।
वाढता वाढता वाढे कीर्ती फार
जगातून येतील भक्त फार ।।१५।।
जसे भक्त करतील गणेशाची सेवा
प्रसन्न होऊनी गणेश देई मेवा ।।१६।।
गरिबा घरी मुंगी साखरेचा रवा
गरिबांना वाटेल राशन दवा ।।१७।।
मज आशीर्वादाने भक्त करोड
दान करतील दशलक्ष करोड।।१८।।
सिद्धी रिद्धी करतील परत फेड
मोजताना भक्ता लागेल वेड।।१९।।
चतुर्थी अंगारकी संकष्टीचे वेड
रांगेत भक्त दिवस दीड।।२०।।
तेथेच पूजा हनुमान
संरक्षण करेल हनुमान ।।२१।।
आता करू नका अनुमान
नका करू आता अनमान ।।२२।।
जगात वाढेल विनायकाचा मान
जगभर तो सिद्धिविनायक छान ।।२३।।
जसे प्रसिद्ध शिर्डीचे साई
जणू काशी गया वाई ।।२४।।
जसे माझे अक्कलकोट
तसेच होईल भक्तीचा कोट ।।२५।।
गर्दी भक्तांची अलोट
मंगळवार जणू सागरी लाट ।।२६।।
संकष्टी चतुर्थी प्रचंड लाट
माघी गणपती महान लाट ।।२७।।
अंगारकी चतुर्थीला मोदक ताट
मंगळवार, रविवार सोन्याचे ताट।।२८।।
मी जसा ब्रह्मा विष्णू महेश
पूर्वाश्रमीचा दत्तात्रय ईश ।।२९।।
तसाच तो पार्वतीचा गणेश
शंकर पार्वतीचा प्रेमळ गणेश ।।३०।।
दाही दिशांमध्ये त्याचाच वास
प्रसन्न होई तो एकवीस दुर्वास ।।३१।।
वृद्ध अपंगांना मदतीची वृत्ती
विधवा महिलांनाही शिष्यवृत्ती ।।३२।।
विद्यार्थ्यांना देईल शिष्यवृत्ती
कॉलेजकुमारांना लाखाची वृत्ती ।।३३।।
पुजाऱ्यास मिळेल लाखोची निवृत्ती
सर्वच सेवेकऱ्यांची चांगली प्रवृत्ती ।।३४।।
हृदय रोपणासाठी लाखोची वृत्ती
कीडनी रोपणासाठी दशलक्ष वृत्ती ।।३५।।
हॉस्पिटल डायलेसिससाठी सेवावृत्ती
गरीब आजाऱ्यांसाठी मदत कृती ।।३६।।
देता गणेशास भक्तीने दहा
देईल तुम्हास दशलक्ष महा ।।३७।।
त्याच्या नजरेत नजर देऊन पाहा
३३ कोटी देवतांचे स्थान महा ।।३८।।
भक्तांसाठी जसा अक्कलकोट
जगात पसरवेल सनातन धर्म
हातात भगवा झेंडा हेच मर्म ।।३९।।
लढतो मी करून छातीचा कोट ।।४०।।
मोठे जसे गणेशाचे पोट
पोटात देव ३३ कोट ।।४१।।
माझ्या आशीर्वादाने मुंबईचे संरक्षण
करेल २१ मोदकांचे भक्षण ।।४२।।
सर्व भक्तांचे संकटात रक्षण
आठवण करता प्रसन्न होईल तत्क्षण ।।४३।।
१०० वर्षांत १०० फुटांचा कळस
करोडो रुपयांचा सोन्याचा कळस ।।४४।।
बाळ गणेश धरेल बाळस
नेत्रात त्याच्या तेज फारस ।।४५।।
गणेशाचे सिद्धिविनायक असे बारस
रिद्धी सिद्धी उंदीरमामा वारस ।।४६।।
जांभेकरानो थांबू नका एक दिवस
त्वरित कारवाई करा एक दिवस ।।४७।।
प्रभादेवीस पोहोचले पाहून मंगळवार दिवस
मंदार वृक्षाचे रोपटे लावले मंगल तो दिवस ।।४८।।
१०० वर्षे चंद्र सूर्य देती आशीर्वास
नवग्रह नक्षत्र गोळा त्या दिवस ।।४९।।
आवाहन केले मंगल दिवस
गणराया प्रसन्न व्हा प्रत्येक दिवस ।।५०।।
स्वामी वदले वाढेल तो दिवसेंदिवस
उजाडणारा प्रत्येक तो सोन्याचा दिवस।।५१।।
सिद्धिविनायक सर्वा प्रसन्न
रिद्धी सिद्धीचा तो स्वामी तुम्हा प्रसन्न ।।५२।।

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -