Monday, July 8, 2024
Homeक्रीडाIPL 2024मुंबईने घेतला पंजाबचा बदला

मुंबईने घेतला पंजाबचा बदला

पंजाबवर सहा विकेटने विजय

सूर्यकुमार-ईशानने लावला विजयाचा ‘तिलक’

मोहाली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा ४६ वा सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात मोहालीच्या आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियममध्ये खूपच रंगतदार असा झाला. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघांनी आतापर्यंत ३० सामने खेळताना १५-१५ सामने जिंकले आहेत. मोहाली स्टेडियमवर दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी चार सामने जिंकले आहेत.

मुंबईच्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पंजाबच्या गोलंदाजांना चांगलेच धुतल्यामुळे मुंबई इंडिन्सला विजयासह आपल्या पराभवाचा बदला घेता आला. यापूर्वी झालेल्या सामन्यात पंजाबने मुंबईला पराभूत केले होते. पण मुंबईने बुधवारच्या या सामन्यात दमदार विजय साकारला. पंजाबने मुंबईपुढे विजयासाठी २१५ धावांचे आव्हान ठेवले होते. पण सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांमुळे मुंबईला विजय मिळवता आला. सूर्याने यावेळी ३१ चेंडूंत ६६ धावांची तुफान खेळी साकारली. तर इशानने ४१ चेंडूंत ७५ धावा ठोकल्या.

पंजाबच्या २१५ धावांचा पाठलाग करताना मुंबईला रोहित शर्माच्या रुपात पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. रोहितला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. पण त्यांनतर काही काळ कॅमेरून ग्रीन आणि इशान किशन यांची जोडी जमली होती. पण ग्रीन यावेळी २३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर इशान आणि सूर्या यांची चांगली जोडी जमली. इशान किशनने यावेळी २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने तर २३ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आपले इरादे स्पष्ट केले. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहितचा हा निर्णय पंजाबच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कारण पंजाबच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच सामचार घेतला आणि २०० धावांचा टप्पा पुन्हा एकदा गाठला. पंजाबची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. अर्शद खानने दुसऱ्याच षटकात पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर शिखर धवनने दमदार फटकेबाजी केली. पण सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धवन एक मोठा फटका मारायला गेला होता. पण त्यावेळी धवनचे टायमिंग चुकले आणि त्यामुळे त्याचा झेल उडाला होता. हा झेल टिपण्याठी जोफ्रा आर्चर उभा होता. त्याच्यासाठी हा सोपा झेल होता. पण जोफ्राला यावेळी चेंडूचा अंदाज घेतला आला नाही. त्यामुळे हा चेंडू त्याच्या हातावर बसला आणि उडाला. त्यामुळे धवनला यावेळी जीवदान मिळाले होते. पण धवनला या जीवदानाचा चांगला फायदा उचलता आला नाही.

 

विस्फोटक लिव्हिंगस्टोन…
लियाम लिव्हिंगस्टोन याने विस्फोटक फलंदाजी केली. त्याने ४२ चेंडूत ८२ धावांचा पाऊस पाडला. त्यामध्ये त्याने चार षटकार आणि सात चौकारांचा पाऊस पाडला. लियाम लिव्हिंगस्टोन याने जितेश शर्माच्या साथीने मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. लिव्हिंगस्टोन याने जोफ्रा आर्चर आर्चरला लागोपाठ तीन षटकार मारत धावसंख्या वाढवली. लिव्हिंगस्टोन याला जितेश शर्मा याने चांगली साथ दिली. जितेश शर्मा याने २७ चेंडूत नाबाद ४९ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. एका धावेवर जितेश शर्माचे अर्धशतक होऊ शकले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -