पुणे : पुण्यात कौटुंबिक हिंसाचार आणि अघोरी कृत्यांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच पुण्यातील कोंढवा भागातून एक धक्कादायक व संतापजनक घटना समोर आली आहे. ३० एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकारात ४० वर्षीय पतीने आपल्या ३५ वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला हिटरचे चटके दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिशय क्रूरपणे पत्नीला बांधून ठेवत पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंधदेखील ठेवले. पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
सदर घटनेतील महिला आपल्या १६ वर्षीय मुलीचा मोबाईल पाहत होत्या. पत्नीच्या हातात मोबाईल पाहून ती कोणाशी तरी बोलतेय असा संशय घेत पतीने तिला फरफटत बेडरुममध्ये नेले व कडी लावली. या जोडप्याची चारही मुले त्यावेळी घरातच होती. या प्रकाराने सगळी मुले घाबरली.
या महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पतीने पत्नीच्या सलवार व ओढणीने तिचे हातपाय बेडला बांधत गुप्तांगावर हिटरने चटके दिले. एवढ्याच क्रूरतेवर न थांबता पत्नीच्या तोंडात स्वतःचा पाय घालत तिच्या अंगावर लघुशंका केली.
दरम्यान, मुलं घाबरुन बाहेर आरडाओरडा करु लागल्याने आरोपीने बेडरुमचा दरवाजा उघडला आणि मुलांसमोरही आपले घाणेरडे कृत्य चालूच ठेवले. महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवताच पोलिसांनी आरोपीला ताबडतोब अटक केली आहे.