Wednesday, July 2, 2025

मुंबईत अनधिकृत शाळाप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

मुंबईत अनधिकृत शाळाप्रकरणी पहिला गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी ) : राज्य शिक्षण विभाग आणि स्थानिक स्तरावर पालिका शिक्षण विभागाकडून शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळांची संख्या लक्षात आली असून बुधवारी अनधिकृत शाळेवर पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील धारावी येथील मॉर्निग स्टार इंग्लिश स्कूल असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शाळेचे नाव असून या शाळेत ७०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे.



शिक्षण विभागाकडून राज्यात सुरू असलेल्या ८०० हून अधिक अनधिकृत शाळांना रितसर परवानगी घेण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र या अनधिकृत शाळांकडे आवश्यक ती कागदपत्रे तसेच सुविधा नसल्यामुळे त्यांनी परवानगीसाठी कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार राज्य शिक्षण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज्य शिक्षण विभाग आधी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने मुंबईच्या स्थानिक पोलीस ठाण्यात अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा नोंदविला आहे.



गेल्या २० एप्रिल रोजी दक्षिण मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून पोलिसात या शाळेबाबत तक्रार करण्यात आली होती. अनधिकृत शाळांना आधी नोटीस पाठविण्यात आली, यामध्ये प्रथम १ लाखाचा दंड आणि यापुढेही शाळा सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये असे दंड लावण्यात येणार असल्याचे नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. मात्र तरीदेखील शाळा सुरू ठेवल्याप्रकरणी मॉर्निंग स्टार इंग्लिश शाळेच्या सचिव सुजाबाई राजाकुमार यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार पोलिसात केली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची जवळच्या शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती देवीदास महाजन यांनी दिली.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा