कर्जत तालुक्यातील घडलेल्या घटनेसंदर्भात केंद्रीय बालहक्क आयोगाकडून गंभीर दखल
नगर : अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १५ दिवस उलटून देखील अद्याप अटक न केल्यामुळे नगरच्या पोलीस अधिक्षकांना केंद्रीय बालहक्क आयोगाने नोटीस बजावली असून दिल्ली येथे आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याचेे समन्स, निर्देश आयोगाने दिले आहेत.
कर्जत तालुक्यातील दुरगांव येथे एक दलित कुटुंब आपले उदरनिर्वाह करण्यासाठी तेथे एका वीटभट्टीवर मजुरी करून आपली उपजीविका करत होते. तेथील वीटभट्टीवर काम करणारा अज्जू समसुद्दीन शेख आणि राजू समसुद्दीन शेख यांनी एका दलित अल्पवयीन मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर काही कामानिमित्त हे आरोपी पीडित तरुणीच्या घरी गेले असता घरी कोणीही नाही याचाच फायदा घेत संबंधित मुलीसोबत या दोनही नराधमांनी पीडित १७ वर्षीय दलित अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करून बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने पाच ते सहा दिवसांनी वीट भट्टी मालकाला देखील आरोपी व त्याच्या वडिलांनी मारहाण केली. तसेच सदर आरोपीवर याआधी पण गंभीर गुन्हे दाखल आहेत. पीडितेने संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करून आज १५ ते २० दिवस उलटून देखील अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केले नाही.
तसेच या गुन्ह्याचे तपासी अधिकारी भरत गडकर तसेच कॉन्स्टेबल कोल्हे व इतर चार ते पाच पोलीस यांनी रात्री बारा वाजता दारू पिऊन मुलीच्या घरी जाऊन दरवाजावर लाथा मारल्या व विचारले की खरच तुझ्यासोबत असे झाले आहे का? आमच्या डोक्याला तुम्ही हा ताप करून ठेवला आहे. व गुन्हा मागे घेण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पीआयवर दबाव टाकला.
तसेच संबंधित घटने संदर्भात नगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांना वारंवार संपर्क करण्यात आला. मात्र त्यांनी कोणत्याही गोष्टीची दखल घेतली नाही. याबाबत केंद्रीय बालहक्क आयोगाने देखील ईमेलवर संबंधित घटनेची माहिती एसपी यांच्या कार्यालयाला विचारली असता एसपी कार्यालयाने माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. म्हणून या संदर्भात आज दिनांक ४ मे रोजी राकेश ओला यांना केंद्रीय बालहक्क आयोगाने नोटीस काढून संबंधित घटनेची सर्व माहिती घेऊन दिल्ली येथे आयोगाच्या कार्यालयात हजर राहावे, असे समन्स, निर्देश आयोगाने दिले आहेत.