'द केरला स्टोरी' चित्रपट करमुक्त करण्यासाठी महिलांचा पुढाकार!

नाशिक : भारतात 'लव जिहाद' या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे चित्रण करणाऱ्या 'द केरला स्टोरी' हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून सकल हिंदू समाजाकडून चित्रपट करमुक्त करण्यासाठी मागणी केली आहे.



'द केरला स्टोरी' या चित्रपटात हिंदू समाजातील मुलींवर जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून आयुष्यातून कशा पद्धतीने उध्वस्त केले जाते, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल. 'द केरला स्टोरी' हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला अधिकाधिक पाहता यावा. याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा, अशी विनंती नाशिक येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.



गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात 'लव्ह जिहाद' चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे निघू लागले आहेत. 'लव जिहाद'च्या या घटनांना अशा चित्रपटांमधून कधीतरी मोठ्या प्रमाणात वाचा फोडण्यात येत असून हिंदू समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसू लागला आहे. राज्यात लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी मागणी होत असून विधिमंडळ अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. पीडित हिंदू मुली आता समोर येऊ लागल्या असून आपबीतीचे कथन करू लागले आहेत.


शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात तरी आता आम्हाला न्याय मिळेल अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली 'लव्ह जिहाद' ला आळा बसेल आणि पीडित हिंदू मुलींना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता प्रत्येकजण करू लागले आहेत.


'द केरला स्टोरी' या हिंदी चित्रपटामुळे तर याचे वास्तव आता खऱ्या अर्थाने उजेडात आले आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत पोहोचावा. यासाठी नाशिक सकल हिंदू समाजाच्या वतीने खास करून महिला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असताना दिसत आहेत.


सदर चित्रपट प्रत्येकाने पहावा हा उद्दात हेतू लक्षात घेऊन राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा, अशी माफक अपेक्षा सर्व हिंदू समाज बांधवांमधून व्यक्त होताना दिसत आहे. आपल्या नेतृत्व व कर्तृत्वामुळे हा चित्रपट नक्कीच करमुक्त होईल. जास्तीत जास्त हिंदू बांधव बघतील अशी अपेक्षा या माध्यमातून सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Ranveer Singh : बॉलिवूड चित्रपटांनाही टक्कर! रणवीर सिंग-श्रीलीलाच्या 'एजंट चिंग अटॅक'ने बॉलिवूडचे बजेट तोडले; जाहिरातीचा फर्स्ट लूक रिलीज

अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) यांच्या आगामी जाहिरातीचा फर्स्ट लूक अखेर रिलीज झाला आहे. 'एजंट

'सरकार कमावतंय, मग मी का नको? काय आहे हे शाहरुख खानचे प्रकरण, सविस्तर वाचा...

पानमसाल्याच्या जाहिरातींवर शाहरुख खानचे सडेतोड उत्तर मुंबई:बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खान हा अभिनेता अजय

फक्त दशावतार, दशावतार आणि दशावतारचं! सहाव्या आठवड्यातही शोज हाउसफ़ुल्ल

मुंबई : कोकणच्या खेळाला, संस्कृतीला चित्रपटांच्या मोठ्या पडदयावर दर्शवणारा सिनेमा म्हणजे 'दशावतार' , १२ सप्टेंबर

या सिनेमासाठी शाहिद कपूरने आकारलं बॉलीवूडच्या करिअर मधलं सर्वात जास्त मानधन.

मुंबई : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच शाहिद कपूर हा सध्या त्याच्या कॉकटेल २ या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये असला

हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवाहन, जिंकलं चाहत्यांचं मन

मुंबई : महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार काही ना काही कारणास्तव चर्चेत

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार : चार महिन्यांत तिसरी घटना, मुंबईतही हल्ल्याची धमकी!

कॅनडा : प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला असून, गेल्या चार महिन्यांत