शिर्डी: जगविख्यात शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील भाविकांना आरतीचा विनागैरसोय लाभ घेता येणार आहे. शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास मिळणे आता अधिक सुलभ झाले आहे. कारण आता शिर्डी येथील साई मंदिरात भक्तांना साईबाबांची आरती करण्याचा पास हा काऊंटरवरच मिळणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साई मंदिर प्रशासनाची बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दर्शन आणि आरतीच्या पासमध्ये होणारा काळा बाजार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर या बैठकीमध्ये शिर्डी ग्रामस्थांनी त्यांच्या अनेक मागण्या मांडल्या. त्यानूसार ग्रामस्थांसाठीही विशेष प्रवेशद्वाराने प्रवेश देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले की, आरतीच्या पासमध्ये काळाबाजार केला जातो. भक्तांची फसवणुक केली जाते. त्या दृष्टीने बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांना मोबाईल आणण्यास बंदी, साईभक्तांना आरती पाससाठी शिफारशीची गरज नसणार, पास काऊंटरवर शिफारस विनामिळणार आरती पास, साईसंस्थान कर्मचाऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण असे निर्णय घेण्यात आले तसेच कर्मचाऱ्यांना साई भक्तांसोबत वाद न घालता सामंजस्याने वागण्याचे आदेश देण्यात आले आहेत.