भाजप आमदार नितेश राणेंचा आज पुन्हा जोरदार हल्लाबोल
मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला. १९९२ साली बाळासाहेबांनी जो राजीनामा दिला तो राऊतांसारख्याच लोकांमुळे दिले होता. यानंतर बाळासाहेब कर्जत फार्महाऊसला निघून गेले होते. त्यामुळे मी म्हणतोय संजय राऊत सारखा माणून घरात घेण्याच्या लायकीचा नाही.
पवार कुटूंबातल्या विषयावर कोणीही राजकारणी भाष्य करत नव्हता. त्यावेळी राऊतांनी भाष्य करुन अजितदादांचा अपमान केला. यांना कोणी अधिकार दिला. का कायम आग लावायला पुढे जातोस, तोंड काळ करायला कशाला जातोस, आधुनिक शकुनी मामा आहेस का तू, संजय राऊत हा शकुनी मामापेक्षाही मोठा कपटी आहे, असे म्हणत त्यांनी राऊतांचा एकेरी उल्लेख केला.
संजय राऊतांमुळेच मुंबईच्या वज्रमूठ सभेमध्ये पोडिअमवरुन वाद
तसचे मुंबईच्या वज्रमूठ सभेमध्ये पोडिअमवरुन वाद झाला. त्यावेळी अजितदादांना आधी मुख्य पोडिअम देण्यात आले नाही. अजितदादांना मुख्य पोडिअम न देणं हा निर्णय पण संजय राऊतांनीच घेतला होता. अजितदादांना अपमानित करण्याच हा प्रयत्न होता. त्याचे घाणेरडे कार्यक्रम स्टेजवरदेखील चालू होते, असे म्हणत त्यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली. अजितदादांची देखील साध्या पोडिअमवर भाषण करण्याची तयारी होती. पण अजितदादांना विशेष पोडिअमविषयी कळल्यावर त्यांनी ते बदलायला लावले, असे राणे म्हणाले.
राऊत हे घरात आल्यानंतर त्यामध्ये आग कशी लावायची असा त्यांचा कार्यक्रम चालू आहे. तसेच राऊत हे मुद्दामहून मोहित कंबोज यांना डिवचत आहेत. तेजस ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या गोष्टी बाहेर यावात, हे राऊतांना हवे आहे, असे ते म्हणाले.
बदनामी कशी करायची हे संजय राऊत यांना माहित…
उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाची बदनामी कशी करायची हे संजय राऊत यांना माहित आहे. तेजस ठाकरेंचा जो व्हिडीओ बाहेर आला तो संजय राऊत यांच्यामुळेच असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. एवढंच नाही तर आधी बाळासाहेब ठाकरेंचे घर संजय राऊत यांनी फोडले. आता पवार कुटुंबात ढवळाढवळ करत आहेत, असाही आरोप नितेश राणेंनी केला आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणात आग लावण्याचं काम संजय राऊत यांच्याकडून सुरु आहे. सामनातून पगार घ्यायचा आणि बोनसचा चेक शरद पवारांकडून घ्यायचा. शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संजय राऊत यांना चिंता वाटू लागली की मी आता कुणाच्या बंगल्याबाहेर वॉचमनच्या शेजारी बसू?” असेही नितेश राणेंनी म्हटले आहे.
संजय राऊत हा अत्यंत घाणेरडा माणूस, आगलाव्या माणूस…
संजय राऊत हा अत्यंत घाणेरडा माणूस, आगलाव्या माणूस आहे. संजय राऊत यांनी मुद्दाम रेडिओ बारचा विषय काढला. मोहित कंबोज यांना डिवचले. त्यामुळेच मोहित कंबोज यांनी तेसज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला. या व्हिडीओत तेसज ठाकरे दारु पिताना आणि मैत्रिणींसोबत पार्टी करतानाचा हा व्हिडीओ आहे.
मोहित कंबोज यांच्याकडे माझी तक्रार आहे…
मोहित कंबोज यांच्याकडे मला एक तक्रार करायची आहे. काल त्यांनी घेतलेली पत्रकार परिषद बरोबर होती. पण एक मला चूक वाटली. त्यांनी तेजस ठाकरेंचे एक बिल दाखवले. ९७ हजार की एक लाख असे काहीतरी आहे. त्या बिलावर लिहिले आहे की हे बिल पेड केले आहे त्यात मला तथ्य वाटत नाही. कारण हे कुणीही बिल भरत नाहीत. फुकट खातात, फुकट शॉपिंग करतात असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे. हॉटेलचे बिल आणि ठाकरे बंधू यांचे काहीही समीकरण नाही. हे लोक कधीही बिल भरत नाहीत, असे नितेश राणेंनी म्हटले आहे.
काय आहे त्या व्हिडीओत?
या व्हिडीओत तेजस ठाकरे हे त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत ड्रींक्स करत असल्याचे दिसत आहे. या हॉटेलचे बिलही ट्वीट करण्यात आले आहे. हा व्हिडीओ कोव्हिड काळातला आहे, असाही दावा करण्यात आला आहे.