मुंबई: निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं अशी खंत व्यक्त करत त्यांनी ६ मे ऐवजी ५ मे रोजी बैठक घ्यावी आणि त्या बैठकीतील निर्णय मला मान्य आहे असं विधान केलं आहे.
शरद पवार म्हणाले की, मी वरिष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं असं मला आता वाटतं आहे. पण मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोधच केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला.
शरद पवार पुढे म्हणाले की, १ मे १९६० रोजी मी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती, त्यामुळे माझं १ मे सोबत माझं अतुट नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो. मला ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे.