मुंबई : राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणातही आजच्या राजकीय भूकंपाने खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार हेच हवेत असे लिहिले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यांच्या ट्विटमधून माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुध्दा हवेत ! अशी इच्छा व्यक्त केली.
माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुध्दा हवेत !@PawarSpeaks
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 2, 2023