Thursday, July 3, 2025

शरद पवार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करताहेत

शरद पवार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करताहेत

संजय राऊतांची टिवटिव


मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी भावूक झाले आहेत. ते पवारसाहेबांना निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी करत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टिवटिव करत आपले ज्ञान पाजळले आहे.


संजय राऊत यांनी, एक वेळ अशी आली.. घाणेरडे आरोप.. प्रत्यारोप.. राजकारण याचा उबग येऊन शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केले आहे. जनतेच्या रेट्यामुळे बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत, असे ट्विट केले आहे.




संजय राऊत यांनी आणखी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, भाकरी फिरवण्याचे संकेत होते.. पण तवाच फिरवला.. शरद पवार काही दिवसांपूर्वी एका भाषणात म्हणाले होते की, भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. त्यावरून संजय राऊत यांनी ही जखमेवर मीठ चोळणारी प्रतिक्रिया दिली आहे.

Comments
Add Comment