मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विनंती करुनही कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. अखेर सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना थेट फोन लावला आणि फोनच्या लाऊडस्पीकरवरुन शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
“तुम्ही आत्ता सगळे तिथे बसला आहात. माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही सगळ्यांनी जेऊन घ्या. त्यानंतर मी तुमच्याशी बोलायला येईन. ” असं म्हटल्यावर कार्यकर्ते शांत झाले. त्यावर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की आम्ही हेच सांगायला तुम्हाला आलो होतो पण तुम्ही विश्वास ठेवला नाहीत. सुप्रिया सुळे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना ऋणानुबंध या ठिकाणी जायला सांगितलं.