Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

साहेबांना सुप्रियाताईंना पुढे आणायचेय...

साहेबांना सुप्रियाताईंना पुढे आणायचेय...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : साहेबांना सुप्रिया सुळे यांना पुढे आणायचेय... त्यासाठीच साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.


यशवंतराव चव्हाण केंद्रात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लिहिलेल्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने पक्षाचे अनेक कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. यातले बहुसंख्य कार्यकर्ते शरद पवारांचे चाहते होते. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून आग्रह धरला. मात्र, त्याचवेळी बाहेर असलेल्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. नजीकच्या काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक कार्यकर्ते आपल्या समर्थकांसह यावेळी हजर होते. त्यातले अनेकजण विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समर्थक होते. शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. आणि हा निर्णय ते कार्यकर्त्यांना, माध्यमांना सांगत असतानाही काही कार्यकर्ते एकच वादा... अजितदादा... अशा घोषणा देत होते.


अनपेक्षित आणि अकालनीय धक्के देणाऱ्या आपल्या वकुबाप्रमाणे शरद पवार यांच्या या निर्णयामुळे कार्यकत्यांना मात्र मोठा धक्का बसला. शरद पवार कार्यक्रम स्थळावरून निघून गेले, मात्र कार्यक्रमस्थळी कार्यक्रर्ते मात्र ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्राबाहेर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले. दुपारी दोन वाजता सुरू झालेले हे आंदोलन तब्बल साडे तीन तास सुरू होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र कार्यकर्ते ऐकत नव्हते.

Comments
Add Comment