Tuesday, July 1, 2025

भोंग्याला उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांची नेमणूक, हिम्मत असेल तर....

भोंग्याला उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांची नेमणूक, हिम्मत असेल तर....

चंद्रशेखर बावनकुळे यांचा नितेश राणे यांना पाठिंबा


संजय राऊत यांचे काढले वाभाडे


नागपूर: कालच्या भाषणात उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांचा खास शैलीत समाचार घेतलाच. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नितेश राणे यांना पाठिंबा देत संजय राऊत यांचे वाभाडे काढले.


ते म्हणाले, तीन वर्षांपासून तुमचा तो भोंगा सकाळपासून सुरू होतो. तो बंद का करत नाही? आता त्या भोंग्यविरुद्ध नितेश राणे यांना उत्तर देण्याची जबाबदारी दिली आहे. नितेश राणे यांच्याविरोधात संजय राऊत यांनी निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांना दिले आहे. तसेच बावनकुळे यांनी, कालच्या भाषणातून निराश, चिंताग्रस्त उद्धव ठाकरे दिसून आले. तेच तेच रटाळ भाषण होते. मुळात त्यांचे कर्तृत्व काहीच नाही. त्यांनी २०२४ मधील निवडणुकीच्या रणांगणात येऊन दाखवावं, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिले आहे.


दरम्यान, बावनकुळे यांच्या समर्थनानंतर नितेश राणे यांनी त्यांचे ट्वीट करत आभार मानले आहेत.






Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >