मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केल्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले आहेत. अजित पवार यांनी सांगितले की, पक्षाची कमिटी जो निर्णय घेईल ते पवारांना मान्य असेल. परंतू कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आज आणि आत्ता तुम्ही निर्णय मागे घ्या, असा अट्टाहास सर्वांनी धरला आहे.
या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भावूक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. तर कमिटी आम्हाला मान्य नाही. तुम्हीच आमची कमिटी आणि सर्वस्व आहात, असे ठाम मत छगन भूजबळ यांनी व्यक्त केले.
कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी भावूक झाले आहेत आणि कार्यकर्ते हट्टाला पेटले असले तरी शरद पवारसाहेब काहीही बोलायला तयार नाहीत.
दरम्यान, या वृत्ताने महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही मोठा धक्का बसला असून राज्यात सत्ताधा-यांसह विरोधी पक्ष आणि राजकीय वर्तुळातील सर्वजण शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.