मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांची भाजपने निवड केली. नितेश राणे राऊत यांच्यानंतर रोज प्रत्युत्तर पत्रकार परिषद घेतात. आज त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, मातोश्री कोण चालवत आहे. गुजराती समाजाचा तुम्हाला पैसा चालतो. उद्धव ठाकरे बाहेर फिरतात, हे पैसे कुणाचे असतात. उद्धव ठाकरेंच्या खिशातून एक रूपयापण जात नाही. सर्व खर्च मुंबईचे उद्योजक आणि बिल्डर करतात. यावेळी त्यांना गुजरात्यांचा पैसा चालतो, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
नितेश राणे म्हणाले, ठाकरेंना गुजरात्यांचा पैसा चालतो. मात्र गुजरात्यांवर टीका करत आहेत. शाहांच्या नावाची अॅलर्जी आहे. पण उद्धव ठाकरे जे बाहेर फिरतात. त्यांचा खर्च कोण करते? गुजराती बंधू मातोश्री चालवतात. मात्र अमित शाहांच्या दौऱ्यावर टीका करतात.
यावेळी त्यांनी संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांचे जावई म्हणून फिरायचे, असाही खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. मविआ संविधान मानत नाही. ते शरीया कायदा पाळणारे लोक आहेत. तोच कायदा हे लोक पाळतात. संविधान पाळत असते तर आमच्या राज्यांमध्ये हिंदूंच्या देवतांवर अन्याय झाले नसते. मुंबईचे तेव्हाचे सीपी संजय पांडे हा उद्धव ठाकरेंचा जावई म्हणून फिरायचा. तो संजय पांडे रझाकारांबरोबर इफ्तार पार्टी करत असतो.
दरम्यान, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटे पेंग्वीन असा उल्लेख केला. काल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हुतात्मा चौकात गेले होते. हुतात्मा चौकाचे शुद्धीकरण करण्याची मागणी देखील राणे यांनी केली.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…