Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी गरजू विद्यार्थीनींना दुसऱ्या टप्प्यातील शंभर मोफत सायकलचे वाटप

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी गरजू विद्यार्थीनींना दुसऱ्या टप्प्यातील शंभर मोफत सायकलचे वाटप

कणकवली : कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील गरजू मुलींना शाळेत जाण्या–येण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने आज महाराष्ट्र दिनी दुसऱ्या टप्प्यातील शंभर मोफत सायकलचे वाटप केले.

आमदार नितेश राणे यांनी दुसऱ्या टप्प्यात १०० शाळकरी मुलींना आज महाराष्ट्र दिनी कणकवलीत ओम गणेश बंगल्यावर मोफत सायकल वाटप केले. सायकल मिळताच मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता.

यापूर्वी ११० सायकल मोफत वितरित केलेल्या होत्या. जसजशी मागणी आणि गरज असेल त्या प्रमाणे मुलींना या सायकल दिल्या जात आहेत.

सायकल हातात आली आणि एक रपेट मारत शाळकरी मुलींनी आपला आनंद व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >