Saturday, May 17, 2025

विदेशताज्या घडामोडी

इसिसचा म्होरक्या अबू हुसैन ठार, तुर्कस्तानने सिरियात घूसून गेम केला

इसिसचा म्होरक्या अबू हुसैन ठार, तुर्कस्तानने सिरियात घूसून गेम केला

इस्तांबूल (वृत्तसंस्था): इस्लामिक अतिरेकी संघटना इससचा प्रमुख अबू हुसैन अल कुरेशी ठार झाला आहे. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांनी याची घोषणा करत, तुर्कस्तानने सिरियात घूसून केलेल्या कारवाईत तो ठार झाल्याचे सांगितले.


इसिसचा माजी प्रमुख अबू हसन अल हाशिमी अल कुरेशी महिन्यांपूर्वी मारला गेला होता, त्यानंतर अबू हुसैनने त्याची जागा घेतली होती. त्याचे सांकेतिक नाव अबू हुसैन अल कुरेशी आहे.


एर्दोगन यांनी सांगितले की, इसिसच्या या नेत्यावर गेल्या काही दिवसापासून त्यांची करडी नजर होती. ते पुढे म्हणाले की, तुर्की दहशतवादी संघटनांशी लढत आला आहे आणि यापुढेही लढत राहील. २०१३ मध्ये तुर्कीने इसिसला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.


दरम्यान, एर्दोगन यांनी इस्लामिक अतिरेकी पाश्चात्य देशांमध्येही कर्करोगाप्रमाणे पसरत आहेत. दहशतवादाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी पाश्चात्य देशांनी अद्याप कोणतेही प्रयत्न केलेले नसल्याचे याआधी म्हटले होते.

Comments
Add Comment