Friday, May 23, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

बीसीसीआयने केली मोठी खेळी, पाकिस्तानचा अहंकारच तोडला

बीसीसीआयने केली मोठी खेळी, पाकिस्तानचा अहंकारच तोडला

नवी दिल्ली: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणजेच पीसीबीच्या आडमुठेपणामुळे आशिया चषक जवळजवळ रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आशिया चषकावर तोडगा म्हणून भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने पीसीबी समोर ठेवला होता. पण पीसीबी त्यांच्या आडमुठेपणा सोडायला तयार नाही त्यामुळे भारतानेच आता नवी खेळी खेळली आहे.


बीसीसीआय आता पाच देशांची स्पर्धा भारतात खेळवणार आहे. जय शहा हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, पीसीबी त्यांच्या मतावर अडून राहिल्यास आशिया चषक रद्द केला जाईल आणि बीसीसीआय त्या विंडोमध्ये पाच देशांना घेऊन भारतात एक स्पर्धा खेळवेल.


२०१८मध्ये आशिया चषक भारतात होणार होता, परंतु पाकिस्तानने येण्यास नकार दिल्याने तो संयुक्त अरब अमिराती येथे खेळवला गेला. असेच काहीसे यंदाही होणे अपेक्षित होते. दोन आठवड्यापूर्वी शहा यांनी आशिया चषकाच्या तयारीबाबत पीसीबीकडे अहवाल मागितला होता. त्यात त्यांनी आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या ठिकाणाबाबत अजूनही कोणतीच माहिती देण्यात न आल्याचे नमुद केले होते. पाकिस्तानच्या या अशाप्रकारच्या हेकेखोरपणामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

Comments
Add Comment