
- ऐकलंत का! : दीपक परब
'किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाला गेल्या पाच दिवसांत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, पण त्यानंतर मात्र या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील गाण्यांना तसेच अॅक्शन सिनला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटाला गेल्या पाच दिवसांत प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता मात्र या चित्रपटाच्या कमाई कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरी हा चित्रपट लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असे म्हटले जात आहे. या चित्रपटामधील ‘छोटू मोटू’,‘येंतम्मा’, ‘नय्यो लगदा’, ‘बिल्ली बिल्ली’, ‘बथुकम्मा’ आणि ‘जी रहे थे हम’ या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री पहिल्यांदाच प्रेक्षकांना पहायला मिळाली. या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.