Saturday, October 25, 2025
Happy Diwali

पहिल्याच दिवशी २३ नागरिकांनी घेतली इन्कोव्हॅक लस

पहिल्याच दिवशी २३ नागरिकांनी घेतली इन्कोव्हॅक लस

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत पुन्हा एकदा डोके वर काढणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेतर्फे मुंबईकरांना २४ लसीकरण केंद्रांवर नाकावाटे घ्यावयाच्या इन्कोव्हॅक लस देण्यात येणार आहे. याचा शुभारंभ आज करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी निरनिराळ्या केंद्रांवर २३ नागरिकांनी याचा लाभ घेतला. ही लस ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्कोव्हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.

कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्कोव्हॅक लस देता येणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील २४ ठिकाणी इन्कोव्हॅक लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पाट नोंदणीद्वारे देण्यात आली असून २४ विभागातील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते मुंबई महापालिकेच्या ट्वीटर खात्यावर दररोज प्रकाशित करण्यात येतील.

Comments
Add Comment