अकोला : अकोला बाजार समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट आणि भाजपप्रणीत सहकार आघाडीची सत्ता आली आहे. सर्व १८ जागांवर एकतर्फी विजय मिळाला असून वंचित समर्थन पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे.
अकोला बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९, भाजप ५, काँग्रेस ३ आणि ठाकरे गटाला २ जागा मिळाल्या आहेत.
अकोला बाजार समितीत सहकार आघाडीत सर्वाधिक ९ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती होण्याची दाट शक्यता आहे.