बिदर : काँग्रेसच्या पापाचा घडा भरला आहे. काँग्रेसने मला ९१ वेळा शिवीगाळ केली, पण प्रत्येक वेळी जनतेने त्यांना नाकारले. सामान्य माणसाबद्दल बोलणाऱ्या, भ्रष्टाचार उघड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काँग्रेस तिरस्कार करते. मोठमोठे महापुरुषही त्यांच्या तिरस्काराचे बळी ठरले आहेत. त्यांच्या (काँग्रेस) शिव्या खाणारा मी एकटाच नाही. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांसारख्या महापुरुषांना शिव्या दिल्या. तेच लोक मोदींनाही शिव्या देत आहेत पण मला फरक पडत नाही, मी जनतेची सेवा करणार आणि भ्रष्टाचा-यांचे पितळ उघड करणार, असा निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर साधला.
पंतप्रधान मोदी यांनी आज बिदर, हुमनाबाद (कर्नाटक) येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
मोदी म्हणाले, या विधानसभा निवडणुकीत मी बिदरमधून प्रचाराला सुरुवात करत आहे, हे माझे भाग्य आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने येथे येऊन तुम्ही संपूर्ण देशाला संदेश दिला आहे की, यावेळीही भाजपचेच सरकार येणार आहे. ही निवडणूक कर्नाटकला देशातील नंबर-१ राज्य बनवण्याची निवडणूक आहे. काँग्रेसने मला कितीही शिव्या दिल्या, तरी मी जनतेसाठी काम करत राहीन. मला कर्नाटकसाठी आणखी सेवा करायची आहे. कर्नाटकच्या विकासासाठी पूर्ण बहुमत असलेले कायमस्वरूपी सरकार हवे आहे, असेही मोदी म्हणाले.
कर्नाटकात गेल्या पाच वर्षात सामान्य माणसाने किती विकास केला, हे आपण पाहिले आहे. तुमची ही स्वप्नं पूर्ण करण्याचे काम भाजपने हाती घेतले आहे. कर्नाटकला देशातील नंबर १ राज्य बनवायचे असेल, तर येथे डबल इंजिनचे सरकार असणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा आम्ही पीएम किसान सन्मान निधीची सुरुवात केली, तेव्हा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार होते. त्यांनी लाभार्थी शेतकर्यांची यादी केंद्र सरकारला पाठवली नाही. इतका शेतकऱ्यांचा द्वेष कशासाठी? छत्तीसगड आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असाही मोदींनी हल्लाबोल केला.
कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागांच्या निवडणुकीसाठी १० मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसने ८० आणि जेडीएसने ३७ जागा जिंकल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…