छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण १५ पैकी ११ जागा भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४ जागांवर विजय मिळवता आला आहे.
या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.