
भिवंडी : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १०० हून अधिक नागरीक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील वळ पाडा परिसरात ही घटना घडली.
स्थानिक रहिवाशांनी अग्निशमन विभाग आणि आपत्कालीन विभागाला फोन करून दुर्घटनेची माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफची टीम, पोलीस पोहचले आहेत. त्यांनी मदत व बचावकार्य तातडीने सुरू केले आहे.
या इमारतीमध्ये सुमारे २५० लोक रहातात. मात्र त्यापैकी काही कामानिमित्त बाहेर गेले असावेत. तर या इमारतीच्या तळमजल्यावर एक गोदाम असून तेथे ३० ते ४० जण काम करतात. यापैकी कोणीही बाहेर पडताना दिसलेले नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.