Monday, May 5, 2025

महामुंबईराजकीयमहत्वाची बातमी

उद्धव ठाकरे हे मविआवरील ओझे

उद्धव ठाकरे हे मविआवरील ओझे

भाजप आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवरही जोरदार प्रहार

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर चौफेर हल्लाबोल करत जोरदार प्रहार केला आहे. एवढ्या लवकर डेसिबल कमी होईल, व तोंड पडलेले दिसेल असे वाटले नव्हते. मी प्रत्युत्तर दिले आणि एकाच दिवसात एम टीव्हीचा आस्था चॅनेल झाला, असे म्हणत नितेश राणे यांनी राऊतांना डिवचले.

याआधी संजय राऊतांनी बोलताना शिंदे गट हे भाजपवर ओझे झाल्याचे म्हटले होते. यावर उद्धव ठाकरे हेच मविआवर ओझे झाल्याचे राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला कालपासून नितेश राणे हे चोख प्रत्युत्तर देत आहेत.

संजय राऊत लावारिस?

राऊतांनी माझ्या एकाच पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. संजय राऊत हे ना शरद पवारांचे आहेत ना उद्धव ठाकरेंचे. ते आता लावारिस आहेत का, असा प्रश्न नितेश राणे यांनी केला आहे. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहित नाही, तो आम्हाला काय शिवसेना शिकवतो, असे म्हणत त्यांनी राऊतांना खडेबोल सुनावले.

१ मे रोजी मुंबईत होणार महाविकास आघाडीची शेवटची वज्रमुठ सभा

तसेच १ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची होणारी सभा ही शेवटची वज्रमुठ सभा असेल, असे म्हणत त्यांनी मविआवर निशाणा साधला आहे. तसेच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे. तरीसुध्दा उद्धव ठाकरे गट शिवसेना या नावाचा वापर करत आहे. याबद्दल मी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment