Sunday, March 23, 2025
Homeक्रीडाIPL 2024‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखण्यात राजस्थान यशस्वी

‘चेन्नई एक्स्प्रेस’ रोखण्यात राजस्थान यशस्वी

शिवम दुबेचे अर्धशतक व्यर्थ

जयपूर (वृत्तसंस्था) : यशस्वी जयस्वालच्या ७७ धावा आणि अप्रतिम सांघिक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सुपर किंग्जला ३२ धावांनी पराभूत करत ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा विजयरथ रोखला. या विजयासह राजस्थानने गुण तालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.

चेन्नई सुपर किंग्जच्या रुतुराज गायकवाडने फटकेबाजी करत आपले इराधे दाखवून दिले. त्याचे अर्धशतक ३ धावांनी हुकले. देवॉन कॉनवे आणि अजिंक्य रहाणे यांनी या सामन्यात निराश केले. कॉनवेने ८, तर अजिंक्यने १५ धावा जोडल्या. अंबाती रायडूने भोपळाही फोडला नाही. १०.४ षटकांत ७३ धावांवर ४ फलंदाज बाद अशी चेन्नईची अवस्था झाला. शिवम दुबे आणि मोईन अली यांनी षटकार, चौकारांची आतषबाजी करत धावांचा वेग वाढवला. १२ चेंडूंत २३ धावा करत मोईन अलीने दुबेची साथ सोडली. त्यानंतर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा यांनी सामना रोमांचक वळणावर आणला. परंतु धावा आणि चेंडू यातील अंतर वाढत गेल्याने अखेर विजय मिळवणे चेन्नईसाठी अशक्य झाले. शिवम दुबेने ५२, तर जडेजाने नाबाद २३ धावा फटकवल्या. शेवटच्या षटकांत राजस्थानने अप्रतिम गोलंदाजी केली. राजस्थानच्या अॅडम झम्पा आणि रविचंद्रन अश्विन यांनी अनुक्रमे ३, २ विकेट मिळवल्या. संदीप शर्मा आणि कुलदीप यादव यांना धावा रोखण्यात चांगलेच यश आले. चेन्नईने २० षटकांत ६ फलंदाजांच्या बदल्यात १७० धावांपर्यंतच मजल मारली.

यशस्वी जयस्वालच्या आक्रमक ७७ धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित २० षटकांत पाच विकेटच्या मोबदल्यात २०२ धावांचा डोंगर उभारला. यशस्वी जयस्वालशिवाय ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी अखेरच्या षटकांत आक्रमक फलंदाजी केली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी राजस्थानला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या सहा षटकांत या दोघांनी ६४ धावांचा पाऊस पाडला. जोस बटलरने संयमी फलंदाजी केली, तर यशस्वी जायस्वालने गोलंदाजांवर आक्रमण केले. महिश तिक्षणा आणि रवींद्र जडेजा यांनी चांगली गोलंदाजी केली. दोघांनीही धावांना चांगलाच लगाम लावत प्रत्येकी एक विकेट मिळवली. मथीशा पथीराना खूपच महागडा ठरला. त्याने ४ षटकांत १२च्या सरासरीने ४८ धावा दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -