Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' ठरला 'फिल्मफेअर २०२३'चा सर्वोत्कृष्ट चित्रपट

आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' ठरला 'फिल्मफेअर २०२३'चा सर्वोत्कृष्ट चित्रपट

फिल्मफेअर २०२३ : भारतीय सिनेसृष्टीतील मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडला. अत्यंत दिमाखदार आणि भव्यदिव्य अशा या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलं. बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेल्या सलमान खानने हा पुरस्कार सोहळा होस्ट केला. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. सोबतच या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला 10 पुरस्कारांसोबत आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला. 'बधाई दो' सिनेमाने आठ आणि 'ब्रह्मास्त्र' सिनेमाने चार पुरस्कार मिळवत बाजी मारली आहे. आलियाच्या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या यशामुळे चाहते खूश होऊन समाजमाध्यमांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

राजकुमार रावला 'बधाई दो' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून अनिल कपूरला 'जुग जुग जियो' चित्रपटासाठी' तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून शीबा चड्ढाला 'बधाई दो' चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ यांनी 'गंगूबाई काठियावाडी'साठी लिहिलेले संवाद यंदा फिल्मफेअरमध्ये 'सर्वोत्कृष्ट संवाद' पुरस्काराचे मानककरी ठरले आहेत. 'बधाई दो' चित्रपटाला सर्वोत्कष्ट कथा आणि पटकथेचा पुरस्कार मिळाला, ज्याचे लेखक अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी आहेत. यंदाचा 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023' सिनेसृष्टीत जवळजवळ साठ वर्षांची कारकीर्द असणार्‍या प्रेम चोप्रा यांना देण्यात आला. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आज (२८ एप्रिलला) कलर्स वाहिनीवर रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >