उसरोलीचा सरपंच अँटिकरप्शनच्या जाळ्यात

मुरूड : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांना शेतक-याकडून गांडूळ खतासाठी शेड च्या परवानगी घेण्यासाठी पन्नास हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत शेतीसाठी तक्रारदार शेतकरी याला गांडूळ खतासाठी शेड तयार करायची होती. त्यासाठी त्याने उसरोली ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता. सदर परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग रायगडने रंगेहाथ पकडले आहे. यासाठी पंचाहत्तर हजाराची मागणी करण्यात आली होती.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ठाणे परिक्षेत्र) चे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे, पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, पोहवा अरुण करकरे,पोहवा विनोद जाधव, पोहवा महेश पाटील, पोना विवेक खंडागळे, पोना जितेंद्र पाटील यांनी सापळा रचून कारवाई यशस्वी केली.


रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली तर तात्काळ दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२३३१ / टोल फ्री क्र. १०६४ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टीकरप्शन ब्युरो, रायगड तर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

पनवेल महानगरपालिकेत भाजप महायुतीचा दणदणीत विजय - शेकाप महाविकास आघाडीचा सपशेल पराभव

पनवेल :  पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

महाडमध्ये ५ गट आिण १० गणांसाठी २०३ मतदान केंद्र

१६ ते २१ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत महाड वार्तापत्र संजय भुवड महाड : तालुक्यात ५ जिल्हा

नवी मुंबई विमानतळाने ओलांडला १ लाख प्रवाशांचा टप्पा

विमान उड्डाणांच्या संख्येत लक्षणीय वाढ नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमआयए) एका

पनवेल–कळंबोली दरम्यान पॉवर ब्लॉक

पनवेल : डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन (डीएफसीसी) प्रकल्पाच्या अनुषंगाने, किमी ६३/१८ ते ६३/२४ दरम्यान ११०

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने