Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

बड्या बांधकाम व्यावसायिकांचा ३,३३३ कोटींचा गैरकारभार उघडकीस

बड्या बांधकाम व्यावसायिकांचा ३,३३३ कोटींचा गैरकारभार उघडकीस

नाशिक : आयकर विभागाच्या पथकाने नाशिक शहर व परिसरातील सात बड्या बांधकाम व्यावसायिकांवर गेले सहा दिवस छापे टाकले. २० एप्रिल रोजी पहाटे सहाच्या सुमारास सुरु झालेली ही कारवाई २५ एप्रिलला संपली. यात तब्बल ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले, तर साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आयकर विभागाची राज्यभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.


नाशिक शहरात बड्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरु असून त्यात लेखी उलाढाल फार कमी दाखवून दिशाभूल केल्याचा संशय आयकर विभागाने व्यक्त केला. नाशिकच्या आयकर अन्वेषण विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे व मुंबई नागपूर कार्यालयातील २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक दिवस- रात्र ही कारवाई करत होते. कुणालाही संशय येऊ नये, यासाठी अधिकारी वेगवगेळ्या ठिकाणाहून कारमधून दाखल झाले. ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांकडून बांधकाम व्यावसायिकांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकण्यात आले.


दरम्यान नाशकातीलच काही पथकांनी ईगतपुरी शहरात एका बड्या लाॅटरी व्यावसायिकाकडे छापा टाकला असता सुमारे ७० ते ८० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याची माहिती समोर आली आहे.

Comments
Add Comment