Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीबेस्ट बसमधील विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा होणार लिलाव

बेस्ट बसमधील विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा होणार लिलाव

बस, जीपचीही होणार विक्री

मुंबई (प्रतिनिधी) : विसराळू प्रवाशांच्या गहाळ वस्तूंच्या लिलावासह बेस्टतर्फे बसगाड्या, जीप भंगारात विक्रीस काढल्या जाणार आहेत. बेस्ट बसमध्ये प्रवासी विसरलेल्या या वस्तू सर्वसामान्यांना घेता येणार नसून घाऊक (लॉटमध्ये) बड्या व्यापाऱ्यांना या वस्तू लिलावात घेता येणार आहेत. एकूण २४५ बसगाड्या विक्रीस काढण्यात येणार असून ३० जीप व १३ लॉरीज बेस्टने विक्रीस काढल्या आहेत.

स्मार्ट मोबाइल, लॅपटॉप, ब्रँडेड वस्तू या बेस्ट बसमध्ये प्रवासी विसरलेल्या वस्तूंचा बंपर लिलाव बेस्टतर्फे लवकरच होणार आहे. अगदी पेन, कपडे, पाण्याची बॉटल ते हजारो रुपयांच्या किंमती वस्तू प्रवासी बसमध्ये विसरतात. घाईगडबडीत अनेक प्रवासी आपल्या किंमती वस्तू बेस्ट बसमध्ये विसरतात. वस्तू बेस्ट बसमध्ये विसरल्यानंतर अनेक प्रवासी बेस्ट बस आगारात संपर्क साधतात आणि गहाळ वस्तू परत मिळवतात. अनेक प्रवासी विसरलेली वस्तू परत मिळणार नाही, असा विचार करतात; परंतु प्रवाशाने संपर्क साधल्यावर ठोस पुरावा दिल्यानंतर संबंधित प्रवाशाला ठरलेले दर आकारून वस्तू परत दिली जाते. मात्र जे प्रवासी आपली वस्तू घेण्यासाठी येतच नाही, अशा प्रवाशांच्या गहाळ वस्तूंचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे.

१४७ घड्याळे, २९५१ छत्र्या, १३० स्मार्ट फोन, विविध कंपन्यांचे १ हजार २८४ मोबाईल, इयर फोन, डोंगल, कपडे, हॅलमेंट, फेस शिल्ड, लेडीज चप्पल, पाण्याची बॉटल यांचा बंपर लिलाव होणार आहे. तसेच ब्लू टूथ, इयर फोन, की बोर्ड व माऊस -पॉवर बँक, लॅपटॉप, कॅमेरा स्टॅन्ड, की बोर्ड, कॅल्क्युलेटर या महागड्या वस्तू लिलावात असतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -