Thursday, December 25, 2025

पुजेसाठी गेलेल्या नातेवाईकांच्या कारला परतीच्या प्रवासात अपघात

पुजेसाठी गेलेल्या नातेवाईकांच्या कारला परतीच्या प्रवासात अपघात

मुरूड : मुरूड राजवाडा येथील घरी परत येत असताना मध्यरात्री १२:३० च्या सुमारास मुरूड मधील इर्टिगा कारचा तोल सुटून गाडी १५ ते २० फूट दरीत पडून अपघात झाला. गाडीतील सहा प्रवाशांपैकी तीन प्रवासी जखमी झाले आहेत.

मुरूड मधील डांगे यांच्या कुटुंबातील मुलीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला होता. दुसऱ्या दिवशी मुलीच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती. त्या निमित्ताने डांगे कुटुंब मुलीच्या सासरी पुजेसाठी गेले होते. रात्री परतीच्या प्रवासात राजवाडा सोडल्यानंतर मुरूड नजिकच आल्यावर उतारात अचानक गाडीचा वेग वाढला. त्यामुळे चालक गाडी सावरु शकला नाही. समुद्रालगत असलेल्या संरक्षक कठड्यावरुन ही गाडी पंधरा वीस फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत असणा-या सहा प्रवाशांपैकी तीन जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला उपचारांकरता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Comments
Add Comment